सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूलचा एस.एस.सी. मार्च-2025 चा निकाल 94.52 टक्के लागला. कु. श्रेयशी कमलाकर लोंढे ही विद्यार्थीनी 85.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याची मानकरी ठरलीय. या हायस्कूलने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखलीय.
हर्षवर्धन प्रशालेतून एकूण 73 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते, पैकी 69 विद्यार्थी चांगल्या क्रमाने पास झाले. कु. पौर्णिमा रमेश कांबळे ही विद्यार्थीनी 83 टक्के गुण मिळवत द्वितीय तर कु. नम्रता सिद्धेश्वर घाडगे 82.80 टक्के प्राप्त करीत तिसऱ्या स्थानी आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
