सोलापूर/सोहेल शेख : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील मुहीत एज्युकेशन सोसायटी मैंदर्गी संचलित उमदा ऊर्दू हायस्कूलचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 चा निकाल 100 टक्के लागला. विद्यार्थीनी कु. महेकशफ अश्फाक कुरेशी ही 74.20 टक्के गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
उमदा ऊर्दू हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष 2013 पासून आजवर इयत्ता 10 वी निकाल सलग 12 वर्षे 100 टक्के निकाल लागण्याचा मान या शाळेने मिळवला आहे. 
कु. सना हरून फुलारी ही विद्यार्थीनी 72.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर, कु. शाहीन महेबुब गोन्ने हिने 72.20 टक्के गुणांवर तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन एम. ए. हिप्परगी, मुख्याध्यापक अ. हमीद हिप्परगी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सौ. एम. एस. दंडोती, सौ. एम. एम. शेख, सौ. ए. एम. हिप्परगी, एम. के. सय्यद यांच्यासह अन्य शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले.
