धामोरी : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी श्रीमती ताराबार्ई आसाराम वाघ यांचं नुकतेच अल्पशः आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ६५ वर्षीय होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा आनंद, दोन मुली,सुन, नातवंडे असा परिवार आहे.
विद्यालयातील शिक्षक अनिल दत्तात्रय वाघ, शिवाजी काशिनाथ वाघ यांच्या त्या चुलती होत.
