घरफोडीसह विविध गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : प्राणघातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, बेकायदेशिर जमाव जमवून दगडफेक आणि घातक शस्त्राने धमकाविणे या सारखे ०७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बजरंग नागनाथ चव्हाण (वय-२९ वर्षे) याच्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास स्थानबध्द करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एमआयडीसी, जोडभावी पेठ आणि फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार बजरंग चव्हाण (रा. सनमडीकर हॉस्पीटलजवळ, सातारा रोड, जत, सांगली) याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे माहीती देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बजरंग चव्हाण यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२२ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशा स्वरूपाची गुन्हेगारी कृत्यं चालू ठेवली. 

त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी, २८ एप्रिल रोजी त्याच्यावर स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, सहाय्यक पोलीस (आयुक्त विभाग-०१) प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे, व.पो.नि. प्रमोद वाघमारे, (एमआयडीसी पोलीस ठाणे), पो.नि. विजय खोमणे, स.पो.नि.तुकाराम घाडगे(गुन्हे शाखा), एमपीडीए पथकातील अंमलदार पो.हे.कॉ./८३३ विनायक संगमवार, पो.हे.कॉ./१२५४ सुदीप शिंदे, पो.शि./१९१६ अक्षय जाधव, पो.शि./६५४ विशाल नवले यांनी पार पाडली.

To Top