लाखनी/सचिन रामटेके : गोंदिया शहरातील रुंगठा कॉम्प्लेक्स इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ, जिथे लोक थुंकतात व घाण असलेल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या मक्का-मदिनाच्या चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या. या कृत्याच्या निषेधार्थ व या प्रकरणात आरोपी असलेल्या चिराग संदीप रुंगठा याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन लाखनी पोलिस स्टेशनमार्फत पोलिस अधिक्षक, गोंदिया यांना पाठविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती संपूर्ण जगभर साजरी होत असताना, गोंदिया येथे घडलेली ही घटना निंदनीय आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक आणि जातीयवादी मानसिकतेतून केले गेले असून, हा दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव आहे. या घटनेमुळे गोंदियातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजातील सर्व स्तरांतून चिराग रुंगठा यांना कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.
यावेळी दिपक जनबंधु, अतुल नागदेवे, सुरेंद्र बंसोड, विजय रंगारी, प्रविण कोचे, संतोष उकनकर, सोहेल खान, इरफान तुरक, रोशन खोब्रागडे, धीरज गोस्वामी, सचिन रामटेके, अनेक जाती-धर्माचे लोक उपस्थित होते.