पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

shivrajya patra

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

सोलापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवारी, 01 मे रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. 

तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी या ध्वजारोहण कार्यक्रमास सकाळी 7.30 वाजण्यापूर्वी पोलीस परेड ग्राउंड येथे उपस्थित रहावे, असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते गुरुवारी, 01 मे रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण होणार आहे. 

तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विहित वेळेच्या पंधरा  मिनिटे अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केलं आहे.

To Top