सर्व भारतीयांनी संविधानाचे महत्व जाणून घेऊन करावं आचरण : हाजी मतीन बागवान

shivrajya patra

सोलापूर :  संविधानामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य, बंधुता, न्याय दिला, आज सर्व भारतीय म्हणून अभिमान बाळगतो. सर्व भारतीयांनी संविधानाचे महत्व जाणून घेऊन आचरण करावे, असे मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनानिमित्त सोमवारी, १४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान बोलत होते.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, मुस्लिम ब्रिगेडचे बशीर सय्यद, हारुण शेख, राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर, वाहिद तांबोळी, हारिस शेख, बाबा शेख, नईम करनूल, खाशिम बेलीफ, गफूर बागवान, रुस्तुम, मोहसीन सिंदगी, अफ्फान बागवान, जैद बागवान, अयान बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

To Top