सोलापूर : क्रांतिसूर्य महात्मा फुले व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने उन्हामुळे भाजलेल्या पायांना संरक्षण मिळावं या हेतूने शहरातील विविध भागात गरजवंतांना पादत्राणांचं वाटप करण्यात आले.
कडक उन्हाच्या वाढत्या तापमानात शहराच्या अनेक भागात गोर-गरीब मनोरुग्ण अनवाणी पायाने उन्हाचे चटके सहन करत फिरताना आढळून आले होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने होटगी रोड, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड. सिद्धेश्वर मंदिर आदी परिसरातील रस्त्यावर अनवाणी फिरणाऱ्या गरजूंच्या पायात पादत्राणं घालून सामाजिक बांधिलकीचं भान जपण्यात आले. यासाठी संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक प्रमोद पवार यांचे सहकार्य लाभले. 
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख छत्रगुण माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर सचिव सिद्धाराम, शहर संघटक सतीश वावरे, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
