सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी, 22 एप्रिल रोजी दुपारी 12.00 वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत.
या नियमान्वये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला व महिला (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रीयांसह) सरपंच पदे निश्चित करावयाची आहेत. तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमास निश्चित केलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार, उत्तर सोलापूर यांनी केलं आहे.