सोलापूर : २०२० व २०२४ या कालावधीमध्ये घरफोडी करणे, चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अमोल नागनाथ गायकवाड (वय-३१ वर्षे) यास सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार तडीपार केलंय.
त्याच्याविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांनी कार्यवाही करुन अमोल नागनाथ गायकवाड (रा. न्यु मेजर परशुराम शाळा शेजारी, शहा नगर, विमुक्त भटका झोपडपट्टी, सोलापूर) यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलं आहे. त्यास तडीपारीनंतर पुणे इथं सोडण्यात आलेलं आहे.