Type Here to Get Search Results !

धार्मिक स्थळी विना परवाना प्रचार सभा घेतल्याने आचारसंहिता भंग; कोठेंविरुध्द गुन्हा दाखल


सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ धार्मिक स्थळ या ठिकाणी प्रचार केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पूर्व भागातील श्रीदत्त मंदिर देवस्थानात ०७ नोव्हेंबरच्या दुपारी घडलीय. श्रीमती धनश्री कोठे असं आरोपीताचं नांव आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्व भाग, दत्त नगरातील श्री दत्त मंदिर देवस्थानात धनश्री कोठे यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. 


धार्मिक स्थळी विना परवाना सभेचं आयोजन करून धार्मिक स्थळी प्रचार केल्याचा ठपका ठेवत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा करण्याकामी लेखी आदेश दिले होते. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लेखी आदेश प्राप्त झाल्यावर लागलीच आकाश श्रीकृष्ण डोके  (रा. डोके मळा, सांगोला रोड, पंढरपूर) यांनी रोजी संबंधित शासकीय कार्यालयात जाऊन धनश्री कोंड्याल यांनी, ०७ नोव्हेंबर रोजी धार्मिक ठिकाणी देवेंद्र कोठे यांचे प्रचारार्थ विनापरवाना बेकायदेशीरपणे प्रचार सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केली.

त्यानुसार धनश्री कोठे यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.