सोलापूर : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त अँटी करप्शन सोलापूर ब्युरो यांच्याकडील अधिकारी,अंमलदार यांनी, शुक्रवारी ०३ नोव्हेंबर रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य प्रतिष्ठान, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील ५० विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून सोलापूर शहरातील शासकीय विश्रामगृह सात रस्ता, रंगभवन चौक, पंचायत समिती उत्तर सोलापूर, पंचायत समिती दक्षिण सोलापूर, पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण येथून पुन्हा शिवछत्रपती रंगभवन मार्गे करप्शन ब्युरो कार्यालयापर्यंत नेण्यात आली.
या रॅली दरम्यान सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी भिंतीपत्रके व माहितीपत्रके वाटण्यात आली, तेथे उपस्थित नागरिकांना अँटीकरप्शन ब्युरो कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात आली.
जिल्हा परिसरातील नागरिकांना 1064 या टोल फ्री क्रमांक संबंधी माहिती देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक, पुणे डॉ. शितल जानवे/खराडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता प्रवीणसिंह रजपूत व इतर सहा सरकारी अभियोक्ता यांचेसह सदर ठिकाणी भिंतीपत्रके व माहितीपत्रके वाटण्यात आली. तेथे उपस्थित नागरिकांना अँटीकरप्शन ब्युरो कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात आली.