अक्कलकोट : तालुक्यातील चपळगांव येथील संचारचे पत्रकार तथा जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक सिध्दाराम शंकर डोळ्ळे(वय ५४ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने आज सायंकाळी निधन झाले. डोळ्ळे गुरुजी यांनी संचार वृत्तपत्राच्या माध्यमातून चपळगाव पंचक्रोशीतील समस्या शासनदरबारी पोहोचविण्यासाठी झटत राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी घडले पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांना व्यायामाची प्रचंड सवय असल्याने ते दररोज किमान पाच ते सहा किलोमीटर सायकल चालवत. आरोग्याचे नियम काटेकोरपणे पालन करणाऱ्या डोळ्ळे गुरुजींच्या दुर्दैवी निधनाने चपळगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता चपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.