सोलापूर/१८ : नवरात्र महोत्सवानिमित्त दि. २४ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरात तर कोजागिरी पौर्णिमा निमित्त दि. २७ व २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने, मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी निर्गमित केले.
२४ ऑक्टोबर रोजी दसरा (विजयादशमी) निमित्त सोलापूर महारानगर पालिका हद्दीतील सर्व किरकोळ देशी विदेशी मद्य विक्री, ताडी अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील. तसेच दि. २७ व २८ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमानिमित्त सोलापूर -तुळजापूर या मार्गावर श्री क्षेत्र रूपाभवानी मंदिरापासून पुढे तुळजापूर मार्गावर सोलापूर जिल्हयाच्या हद्दीत असणाऱ्या सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी अनुज्ञप्त्या विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद राहतील.
महाराष्ट्र मद्य निषेध आधिनियम मधील कलम १४३(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले.