...तोपर्यंत कोणत्याही सर्व पक्षीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय

shivrajya patra


मराठवाडीत रविवारी हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण 

अक्कलकोट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठवाडीत रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा आयोजक दशरथ गायकवाड यांनी दिलीय.

मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही, असा प्रवेश बंदीचा फलक अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडी या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी गावाच्या वेशीजवळ लावलाय. 

सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मराठवाडी (तालुका अक्कलकोट) या गावात प्रवेश बंदी चा निर्णय घेण्यात आला असून संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी दहा वाजता हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन सकल मराठा आयोजक दशरथ गायकवाड, मा उप सरपंच लक्ष्मण जाधव मा सरपंच मनोहर कुसेकर, दत्ता घाटके, मा सरपंच पांडुरंग गायकवाड, रणजित गुळवे, लहु गुळवे, राजेंद्र जाधव, विष्णू जाधव, तुळजाराम गाजरे, स्वामिराव निंबाळकर, बंडु पवार, जगन्नाथ गुळवे, राहुल पाटोळे यांनी करण्यात केलं आहे. 
To Top