मंत्री बच्चूभाऊ यांच्या हस्ते कवी चौगुले यांचा सत्कार

shivrajya patra
 

धाराशिव : येथील गवळी गल्ली हनुमान मंडळ येथे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री बच्चूभाऊ यांच्या हस्ते कवी भगवान चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवी चौगुले सर यांनी, दिव्यांग मंत्रालयावर आधारित कविता सादर मिळाली. 
त्या कवितेची फोटो काॅपी ना. बच्चूभाऊ यांना सप्रेम भेट देण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य हुच्चे सर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माझ्या स्वामी समर्थ मूकबधिर शाळेतील फातिमा शेख, नंदिनी घोगरे, सिमरन शेख, रितेश घरटे, रोहिणी घुटे,  शायस्ता सय्यद, जैद सय्यद, महेश देवकुळे, या आजी-माजी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

फातिमा शेख हिने हाताने तयार केलेले लोकरीचे मोबाईल कव्हर ना. बच्चूभाऊ यांना सप्रेम भेट दिले.
To Top