सोलापूर :
लोकमंगल को ऑप बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रविवारी २४ सप्टेंबर रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय येथील लोकमान्य टिळक सभागृह येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी आमदार सुभाष देशमुख यांची सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सन २०२२-२३ सालात बँकेच्या दिवंगत सभासद खातेदार व देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शूर वीरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष आ. सुभाष वापू देशमुख यांनी सर्व सभासद हे बँकेचे मालक असून त्यांनी वेळोवेळी शाखेत जाऊन आपल्याला असलेल्या शंकेचे निरसन करून घ्यावे. वार्षिक सर्वसाधारण सभेला जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहावे जेणे करून हा दिवस सभासदांच्या हक्कांचा दिवस असतो. बँकेचे सभासद हे जेष्ठ नागरिक असून त्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ हा आता सामाजिक उपक्रमात घालवावा. ज्या सभासदांचे भाग भांडवल कमी आहे, त्यांना भाग भांडवल वाढविण्याचे आवाहन केले.
अहवाल वर्षात वॅकेचे ठेवी ६०२ कोटी, कर्जे ३७७ कोटी, वंकेचा सीआरएआर १९.१८%, निव्वळ एनपीए ४.६३% तर बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला असून निव्वळ नफा ४ कोटी ८० लाख इतका झालेला आहे. डिजीटल बँकीगंच्या धर्तीवर लोकमंगल बँकेने युपीआय (QR CODE) प्रणालीचा शुभारंभ केला.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण व बँकेला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बँकेचे ज्येष्ठ सभासद दिवाकर नारायण रेळेकर (माजी सैनिक) यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सभासदाच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.
२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बँकेचे उपाध्यक्ष प्रदिप नागणे, देवानंद चिलवंत, सतिश लामकाने, जॉन चोप्रा, अनंता चव्हाण, प्रल्हाद कांबळे, नरेंद्र काटीकर, निलेश पटेल, जितेंद्र नाईक, सिध्दार्थ सर्जे, अशोक सापटणेकर, सौ. उज्वला चेळेकर, सौ. शितल कोकाटे, अशोक मादगुंडी, विजय कुलकर्णी, अभिजीत टाकळीकर, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस व वैधानिक लेखापरिक्षक चंद्रकांत इंजामुरी तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अहवाल वाचन बँकेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा व्हनमराठे यांनी केले.