विद्यापीठात मुस्लिम बांधवांनी केली श्री गणेशाची पूजा व आरती ! सामाजिक एकतेचे घडविले दर्शन !!

shivrajya patra
सोलापूर : 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कर्मचारी संघटनेकडून प्रतिष्ठान करण्यात आलेल्या श्री गणरायाची पूजा व आरती विद्यापीठातील मुस्लिम कर्मचारी बांधवांनी करून सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अनेक उपक्रम राबवले जातात. गेल्या ७-८ वर्षापासून विद्यापीठ परिसरात विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व कर्मचारी भक्ती भावाने यामध्ये सहभागी होतात. 

त्यातच आज शुक्रवारी विद्यापीठातील मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख आदी मुस्लीम कर्मचारी बांधवांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली. यामुळे विद्यापीठ कर्मचारी संघटनेने या उपक्रमातून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा संदेश दिला आहे. संपूर्ण १० दिवस विविध कार्यक्रमातून उत्सव साजरा केला जातो. महाप्रसादाचेही सर्वांना वाटप केले जाते.

यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात, सचिव रविकांत हुक्किरे, खजिनदार हरिष गारमपल्ली, मार्गदर्शक सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, परीक्षा प्रभारी संचालक डाॅ. मलिक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, संगमेश्वर मठ, प्रशांत भोसले, पंकेश व्हनमाने, शिवा बोराळे, मेजर ताटे, हणमंत लोखंडे, महेश पवार, सदानंद भादुले आदी उपस्थित होते. 
...............................
फोटो ओळी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात श्री गणरायाची आरती विद्यापीठातील मुस्लिम कर्मचारी मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलिम शेख यांनी केली. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनिल थोरात, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, हणमंत लोखंडे, सदानंद भादुले, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, महेश पवार, संगमेश्वर मठ आदी छायाचित्रात दिसत आहेत.
To Top