राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'प्रदेश सरचिटणीस' पदी संतोष रायपुरे यांची नियुक्ती

shivrajya patra
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने संतोष साहेबराव रायपुरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'प्रदेश सरचिटणीस' पदी नियुक्ती करण्यात आली. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल मातेले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
To Top