बीड : पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकारकडून सोडवले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे, पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावीपणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करीत आहे. पत्रकार रोहित धुरंधरे यांना पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगलीच जाणीव आहे.
रोहित धुंरंधरे हे 'शेतकरी राजा' या वृत्तपत्राचे संपादक असून रोहित धुरंधरे हे नेहमीच पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जातात. धाडसी पत्रकार म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोहित धुरंधरे पत्रकारितेबरोबर रुग्ण मित्र सामाजिक फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत.
रुग्ण मित्र फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबाना वैद्यकीय मदत करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समिती च्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे.
या निवडीचे राज्य सरचिटणीस डॉ. आशिषकुमार सुना, राज्य उपाध्यक्ष किरण बाथम, बाळकृष्ण सदाफुले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे, संघटक शंकर माने, कार्याध्यक्ष अप्पासाहेब करचे, सरचिटणीस मंगेश गायकवाड, उपाध्यक्ष बळीराम पवार, परभणी जिल्हा अध्यक्ष शेषराव सोपणे मामा, परभणी जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड, जालना जिल्हा अध्यक्ष डॉ. निर्मल एस. पी., सोलापूर, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार महिला जिल्हा अध्यक्ष सुवर्णा सुना, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे, कार्याध्यक्ष सादिक शेख, सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, पुणे जिल्हा अध्यक्ष वाल्हेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष गौसखान पठाण, कोल्हापूर शहर अध्यक्ष उमेश जाधव, यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.