गणेशोत्सव 'श्रीं' ची पूजा गोकुळ शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदिप पवार यांच्या हस्ते संपन्न

shivrajya patra
कासेगाव/ संजय पवार 
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधील गणेशोत्सव मंडळाची श्री ची पूजा गोकुळ शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रदिप पवार यांच्या हस्ते व माजी तंटामुक्त अध्यक्ष राम आपा चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऊस विकास अधिकारी अमित दाडगे, ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते यशपाल वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी मंडळाच्या वतीने प्रमुख अतिथीचा सत्कार रामहरी चौगुले, निशीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमन तुकाराम जाधव, अल्लाऊद्दीन शेख, संजय पवार, लखन चिलदारे, मंडळ अध्यक्ष सचिन गरड, उपाध्यक्ष संदीप पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केदार ढेकळे, ज्ञानेश्वर रोकडे, मोहन रेड्डी, अभिमान माने, महेश वाडकर, बापू हेडे, सरकार पाटील, गणेश आवताडे, ओंकार चौगुले, अण्णा बरडे, प्रशांत चौगुले, प्रमोद वाडकर, सागर पवार, विनोद वाडकर, शिवपाल रेड्डी, बालाजी माने, शेषराव मिटकरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कदम यांनी केले.

 
To Top