सोलापूर/२७ सप्टेंबर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए.आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात होते. यामध्ये १२ उद्योजकामार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे २८० महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहाय्यक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली.
जिल्ह्यातील नोकरी इच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील १२ नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला होता. ही सर्व रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बी.एस्सी, एम.एस्सी, बँकींग, मशिन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, बी.फार्म, एम.फार्म, नर्सिंग, पॅरामेडीकल, लॅब टेक्टीशियन, मॅकॅनिकल अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी होती.
सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर रोजगार मेळाव्यात ४२९ नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामधून १२ उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे २८० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहाय्यक आयुक्त हनमंत नलावडे यांनी सांगितले.