नालंदा नगर बुद्ध विहार येथे बुद्धविहार सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन

shivrajya patra
सोलापूर/संजय पवार : 
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील सुप्रसिद्ध नालंदा नगर बुद्ध विहार येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून बुद्धविहार सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भूमिपूजन करून या कामास सुरुवात करण्यात आला. 
 
या निधीसाठी कुमार चंदनशिवे व सत्यजित सुबोध वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे सांगून, या बुद्ध विहारमुळे या भागातील संपूर्ण चित्र पालटले आहे. गोरगरीब जनतेला व प्रामुख्याने सुशिक्षित तरुण वर्गही यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेले उपदेश, अभ्यास, सामाजिक समता, मानवी हक्क संरक्षण यांचा उपयोग समाजासाठी करून समाजहितासाठी होईल, असे मत समाजभूषण आण्णासाहेब भालशंकर यांनी
व्यक्त केले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते सुबोध वाघमोडे, समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, अशोक साबळे, महेश मस्के, अविनाश गाडे, राहुल कांबळे, सुशीलचंद्र भालशंकर, अक्षय किरात, रोहित शिंदे, चंद्रमनी वाघमारे, सिद्धार्थ बनसोडे, अशोक प्रधान, रवी कांबळे, अमित सूर्यवंशी आदी नागरिक उपस्थित होते.
To Top