अर्जुनसोंड फाट्यावरील मारहाणीत निराधार सेलचे जिल्हाध्यक्ष जखमी

shivrajya patra
सोलापूर : अज्ञात कारणावरून पाच जणांनी काठी व अज्ञात वस्तूने मारहाण केल्याने सुरेश प्रभाकर हावळे जबर जखमी झाला. त्यास अधिक उपचारासाठी गुरुवारी दुपारी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री अर्जुनसोंड फाट्यावर घडली. पोलीस चौकशीत या घटनेतील सत्य पुढे येईलच, मात्र मारहाणीच्या या घटनेला राजकीय विद्वेषाचा रंग अधिक असल्याचे दिसते.

मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथील रहिवासी सुरेश प्रभाकर हावळे (वय ५० वर्षे) याला वरील नमूद ठिकाणी बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास रस्त्यात अडवून युवराज शिवराम ढेरे त्याचा भाऊ अण्णा व अन्य तीन जणांनी काठी व अन्य वस्तूने मारहाण केली. त्यात तो डोकीस मार लागून जखमी झाला. जखमीस प्रारंभी मोहोळ येथील रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे उपचार करून जखमी सुरेशला आज दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलय. ही मारहाण राजकीय वैमनस्यातून झाली असल्याचा जखमीच्या आप्तेष्टांचे म्हणणे आहे. जखमी सुरेश हावळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे निराधार सेल जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. 




 



To Top