विजापूर रस्त्यावरील २२ सोसायट्यातील खरेदी-विक्री सुरू करा : आ. सुभाष देशमुख

shivrajya patra
 सोलापूर :
शहरातील विजापूर रस्त्यावरील 22 सोसायट्यांमधील खरेदी विक्री सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीसह विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.
 जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून जनावरांच्या चारा नियोजनासंदर्भात तसेच स्थानिक विकासनिधीतून खरेदी केलेल्या खुदाई यंत्राचा सुलभ आणि कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती ठरविण्याबाबत आ. देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. 


सोलापूर शहरातील विजापूर मार्गावरील २२ सोसायट्यांचा खरेदी विक्रीचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला. वनविभागामुळे विजापूर रस्त्यावरील २२ सोसायट्यांमध्ये खरेदी-विक्री सध्या बंद असून ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली केली. यावेळी योग्य तो पाठपुरावा करून लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
देगाव उपसा सिंचनाच्या कामाची पाहणी
 महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे तसेच जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत भीमा कालवा मंडळ सोलापूर देगाव शाखा कालवा आणि देगाव उपसा सिंचनाच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली. यावेळी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.  यावेळी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, कार्यकारी अभियंता कोंडेकर, उपअभियंता मुजावर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
To Top