सोलापूर : अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५.०० ते ६.३० या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या वेळेतच जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.