एनटीपीसी सोलापूर येथे मुलींच्या सक्षमीकरण मोहिमेचा भव्य समारोप समारंभ
सोलापूर : मुलींचं सक्षमीकरण मोहीम ही केवळ एक कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी नाही तर आमची वचनबद्धता देखील आहे. ज्याद्वारे आम्हाला देशातील प्रत्येक मुलगी शिक्षित, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवायची आहे, असं प्रतिपादन एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक शास्त्री यांनी केले.
सोमवारी, ९ जून रोजी एनटीपीसी सोलापूर येथे मुलींच्या सक्षमीकरण मोहिमेचा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिनाभर चाललेल्या या निवासी कार्यशाळेत होटगी स्टेशन आहेरवाडी, तिल्हेहाळ आणि होटगी गावातील एकूण ४० मुलींनी भाग घेतला होता. या शिबिराच्या समारोपप्रसंगी कार्यकारी संचालक शास्त्री होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ एनटीपीसीच्या गाण्याने आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमादरम्यान, सर्व सहभागींनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आपली प्रतिभा दाखवली. स्वसंरक्षण आणि योगाच्या माध्यमातून मुलींनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचे प्रदर्शन केले, ज्यामुळे उपस्थित सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मुलींच्या सक्षमीकरण मोहिमेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम विभाग-१) कमलेश सोनी, श्रीमती अनु सोनी, अध्यक्षा सखी महिला समिती, कार्यकारी संचालक बी. जे. सी. शास्त्री, महाव्यवस्थापक एम. के. बेबी (ऑपरेशन आणि मेंटेनन्स), श्रीमती पद्मा शास्त्री, अध्यक्षा सृजना महिला मंडळ, श्रीमती सिबी बेबी, उपाध्यक्ष सृजना महिला मंडळ, एनटीपीसीचे वरिष्ठ कर्मचारी आणि जीईएम मुलींचे पालकांची उपस्थिती होती.
पालकांना संबोधित करताना श्रीमती अनु सोनी म्हणाल्या की, जेव्हा एक महिला सक्षम होते, तेव्हा तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब आणि समाज देखील सक्षम होतो.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींना कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे आणि ग्रुप फोटो देण्यात आले.