Type Here to Get Search Results !

क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू हर्षवर्धन भोसले कांस्यपदकाचा मानकरी


मोहोळ/प्रतिनिधी : तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या कलरीपयट्टूच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू हर्षवर्धन भोसले याने कांस्यपदक जिंकत घवघवीत यश संपादन केले.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन कलरी पयट्टू फेडरेशनच्या वतीने दिनांक ३०, ३१ मे व १ जून रोजी तिरुअनंतपुरम, केरळ येथे १७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये २० राज्यातून ८०० खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेमध्ये मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या हर्षवर्धन रणजीत भोसले याने १४ वर्षाखालील गटामध्ये हायकिक या प्रकारात अगदी अटीतटीचा सामना करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

त्याच्या यशाने सोलापूर जिल्हा व क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमीला राष्ट्रीय स्पर्धेचे पदक मिळवून देणारा हर्षवर्धन हा एकमेव खेळाडू ठरला आहे. हर्षवर्धन हा मार्शल आर्ट्स प्रशिक्षक तथा कलरी पयट्टू असोसिएशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षापासून क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मार्शल आर्ट्सचे धडे घेत आहे. हर्षवर्धनच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

...चौकट

क्रांतिवीर भगतसिंग अकॅडमीची यशाची परंपरा कायम

मोहोळ येथील क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी चे खेळाडूंनी कलरी पयट्टूच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्यापासून म्हणजेच जुलै २०२४ मध्ये पाचगणी येथे तर एप्रिल २०२५ मध्ये नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले होते. 

त्याचबरोबर २०२४ मध्ये तिरुअनंतपुरम, केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कु. सिद्धी पांढरे हिने हायकिक या प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकत सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्पर्धेचे पहिले पदक मिळवून दिले होते.

यावर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकून सोलापूर जिल्ह्याला पदक मिळवून देणारा एकमेव खेळाडू होण्याचा मान हर्षवर्धनने मिळवत क्रांतिवीर भगतसिंग अकॅडमी ची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

दशरथ काळे 

प्रशिक्षक तथा अध्यक्ष: कलरीपयट्टू असोसिएशन सोलापूर जिल्हा