पुणे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्टेशन समोरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयु. अशोक धिवरे (सेवानिवृत्त अॅडीशनल डि.जी.सी.आय.डी. क्राईम, पुणे) आयु. अशोककुमार दिलपाक (नियोजित शाक्य संघ, संघटक महाराष्ट्र) आयु. गोविंद जगताप (नियोजित शाक्य संघ शौर्यविजय स्तंभ, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पुणे) आयु. विठ्ठल गायकवाड (मुख्य समन्वयक), माता रमाई ट्रस्ट, पुणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून तिन्ही संघटनांनी पथ संचलन करीत बिगुल वाजवून सलामी दिली.
नियोजित शाक्य संघ शौर्य विजयस्तंभ, पोलीस अधिकारी पुणे यांनी विशेष ड्रेसकोडमध्ये सोबत यशसिध्दी आजी-माजी सैनिक (महार रेजीमेंट पुणे) व समता सैनिक दल यांच्या समवेत एकत्रीत जय भीमचा नारा देऊन दिलेल्या सलामी प्रसंगी खूप मोठा जन समुदाय जमला होता.
याप्रसंगी फुलचंद वाघमारे, भिमाशंकर दिलपाक, अर्जुन कांबळे, विजय सरवदे, नवनाथ आडसुळ, डी. बी. थोरात, बाबासाहेब माने, महादेव आठवले, रमेश सोनवणे, गौतम थोरात, हेमंत चोपडे, ज्ञानेबा आडसुळे, अरुण ओव्हाळ, रमेश निकाळजे, बबन गायकवाड, महेंद्र बडेकर, पद्माकर सपकाळ, माणिक भोसले, महेंद्र रणधीर, पांडुरंग कांबळे, राजेंद्र कांबळे, गंगाराम आडसुळे, अनिल सरवदे, सुरेश लोंढे, अनंत भालेराव, अशोककुमार शेलार, विष्णू गायकवाड, कल्लप्पा तेरदाळ, किशोर साळवे, भगवान हिगोंली (माजी कॅप्टन), सुरेश वानकट्टी, धनराज दाबाडे (आजी माजी सैनिक, महार रेजीमेंट, पुणे),
पांडुरंग ढोबळे, राजरत्न थोरात, सुभाष कांबळे, सुरेश ओव्हाळ, बाबासाहेब पाटोळे (समता सैनिक दल, पुणे), रंजना रणपिसे, प्रेमा चव्हाण, रुपाली बडेकर, अंजली आडसुळे, दिक्षा कांबळे, सागरबाई ओव्हाळ, नंदा लोंढे, छाया वाघमारे, अंजली वाघमारे, अश्विनी वानखेडे, रेखा माने, यशस्वी बडेकर, प्रणाली बडेकर (शाक्य संघ, शौर्य विजस्तंभ, महिला बिग्रेड, पुणे वगैरे बहुसंख्य बौध्द उपासक व उपासिका हजर होत्या, असं आयु. सुभाष सर्वगोड ( नियोजित शाक्य संघ, शौर्य विजयस्तंभ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पुणे) यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये सांगितलंय.