सोलापूर : आपल्या अविट आवाजात हिंदी सिनेसृष्टीला अविस्मरणीय गाणी देऊन गेलेले मोहम्मद अझिज यांच्या सहाव्या स्मृतीदिन आणि येथील सरगम स्टुडिओच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६ वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे 'यादों की महफिल' हा लाईव्ह कराओके कन्सेप्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मोहम्मद आरिफ एलाल यांनी दिलीय.
या कार्यक्रमाला प्ले बॅक सिंगर जन्नतवासी मोहम्मद अझिज यांची सुकन्या प्ले बॅक सिंगर सना अझिज यांची प्रमुख अतिथी म्हणूनउपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑर्केस्ट्रा स्टार जब्बार मुर्शद आणि धनंजय याची मोलाचं सहकार्य मिळाल्याचं मोहम्मद आरिफ एलाल यांनी यावेळी म्हटलंय.
या कार्यक्रमात सोलापुरातील सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अनिता अय्यर, पुनम लाडे, आम्रपाली लोखंडे यांच्यासह आणि कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात केवळ रुपये 200 आणि रुपये 300 प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमातून मिळणार संभाव्य उत्पन्न वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावर खर्च करण्यात येणार असल्याचेही मोहम्मद आरिफ एलाल यांनी शेवटी सांगितले.