Type Here to Get Search Results !

लक्ष्मीपूजनात पूजलेल्या ' लक्ष्मी' ' ने भरलेले ताट चोरीस

                                      (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : लक्ष्मीपूजन करण्याकरीता पुजेची मांडणी करून चांदीच्या ताटात ठेवलेले ४२ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. ही घटना विजापूर रस्त्यावरील हरे कृष्णा विहारमध्ये, सोमवारी, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. लक्ष्मीपूजनात पूजलेल्या 'लक्ष्मी' ने भरलेले ताट चोरीस गेले.

विजापूर रस्त्यावरील हरे कृष्णा विहार मधील चौथ्या विंग मधील रहिवासी नितीन विलास पोळ यांच्या घरी दीपावलीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पूजेच्या सर्व साहित्याबरोबर चांदीच्या ताटात ४२ हजार रुपयांची रोकड पूजेसाठी ठेवले होते. 

नितीन यांची आई ही लक्ष्मीपुजन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळी उठून पुजेचे पाणी टाकण्यासाठी अर्पाटमेंटमधील तळमजल्यावर येऊन पाणी टाकण्याकरीता गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे हॉलच्या उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून ४२ हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे ताट चोरुन नेले. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक शेळके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.